Home - Maharashtra State Lottery

महाराष्ट्र राज्य लॉटरी

महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना दि. १२ एप्रिल १९६९ रोजी झाली. समाजातील मटका व जुगार ह्या व्यसनांना प्रतिबंध घालून, त्यातून होणारी जनसामान्यांची फसगत टाळण्यासाठी, राज्याच्या वित्त‍ विभागाने ह्या लॉटरीची सुरुवात केली. ही राज्य, संचालित लॉटरी विश्वासार्ह असून ती अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून जनतेला आपली स्वप्ने साकार करण्याची संधी देते. लॉटरी विक्रीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग राज्या‍तील पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी होतो. त्याचप्रमाणे लॉटरीची विक्री करणे हा अनेक बेरोजगार तरुणांसाठी पूर्णवेळ किंवा अर्धवेळ व्यवसाय झाला आहे.

आजपर्यंतची उद्दिष्टपूर्ती

महाराष्ट्र राज्य लॉटरीने आज पर्यंत अनेक विजेत्यांचे जीवन आनंदी केले आहे. गेल्या ५ वर्षात २३२७ पेक्षा जास्त व्यक्ती लखपती झाल्या . बक्षिसाच्या रकमेचा उपयोग अनेकांनी त्यांच्या व्यवसायवृध्दीसाठी, शेतीसाठी, वाहन वा ट्रक्टर खरेदीसाठी, घर खरेदीसाठी किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी केला. प्रत्येक सोडत जाहीररित्या पंच मंडळासमोर घेतली जाते. सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्राद्वारे किंवा ड्रममधून निवडले जातात. अशा रितीने सोडती पारदर्शक आणि विश्वासार्ह असतात. गेल्या ४२ वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीने आपले बोधवाक्य् ‘गौरवशाली आणि विश्वा्सार्ह’ सत्या्त उतरविले आहे.